‘अथांग प्रामाणिकपणा ‘
बहुतेक २००४ / २००५ साल असावं. खापरखेडा विद्युत केंद्रात सहाय्यक अभियंता होतो व नागपुरला राहणं. Car pool सोबत श्री काटे, विजयकुमार, गुंटुरकर साहेब असल्याने प्रवास मनोरंजक व्हायचा. त्या सायंकाळी देखील नेहमीप्रमाणे घरी आलो. बघतो तर काय सौ. चा चेहरा काही तरी विषेश गोष्ट सांगायला उत्सुक. बरं ते दिवस नेमके असे कि सगळ्या बाजारपेठेत SALE सुरु. खरेदीचा बेत असावा असा अंदाज.
आणि चहापाणी होताच सौ. सांगती झाली. घडलेला प्रसंग विलक्षण होता. तो तिच्याच शब्दांत व्यक्त करायला हवा.
” अहो आज दुपारी आम्ही, म्हणजे मि आणि शेजारच्या वहिनी खरेदीला धरमपेठ ला गेलो होतो. जातांना व येतांना सायकल रिक्षा केला. येतांना काय झालं कि भरपुर खरेदी असल्याने काही सामान रिक्षाचे सिटवर ठेवले. घरी आल्यावर मि रिक्षाचे भाडे दिलं, घरात आलो. काही वेळाने बघते तर काय शेजारच्या वहिनी रडत घरी आल्या. त्या त्यांची Purse रिक्षातच विसरल्या होत्या. Purse मध्ये पैसे, दागिने मिळुन १५००० चा ऐवज होता. कसचा परत मिळतो. कसेतरी समजावून घरी पाठवलं.
आणि थोड्याच वेळात तो रिक्षा वाला परत आला सोबत अजुन एक रिक्षामित्र. आणि त्याने Purse परत केली. संपुर्ण ऐवज जसाच्या तसा. आणि सांगत होता रिक्षा स्टॅंड वर गेल्यावर Purse दिसली, मित्राला सांगितले व दोघं परत आलो. तपासुन घ्या. ”
आता या प्रामाणिकपणा ला अथांग म्हणू नये तर काय म्हणावे ; ज्याला शिक्षण, आर्थिक स्थिती, हुद्दा…..कशाचेही बंधन नाही.
( अनुभव व लेखन – दिपक जैन )
Great Experience ! Education is nothing without moral values... Morality make your life worth living.